Chinchwad

हिंजवडीतील कासारसाई बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक

By PCB Author

September 25, 2018

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीतील कासारसाई येथे चॉकलेटचे अमिष दाखवून ऊसतोड मजुरांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना रविवारी (दि.१६ सप्टेंबर) घडली होती. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला होता. या घटने बाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून त्या दोन मुलींवर दोघांनी नाही तर एकूण चौघांनी बलात्कार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

सुमीरन गुरुदास गायकवाड ( वय १८ ) आणि सोमनाथ अतिष वाघोले (२३, दोघे रा. दारुंब्रे, मावळ ) या दोघांना सोमवारी (दि.२४) रात्री उशिरा अटक करण्यात आली.  तर गणेश निकम ( २२, रा. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कर्मचारी वसाहत, कासारसाई ) याच्यासह आणखी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१६ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास कासारसाई येथील एका मंदिराच्या मागच्या बाजूच्या झुडपात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते. या घटनेत एका मुलीचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी दुसऱ्या मुलीला विश्वासात घेऊन घटने बाबत माहिती घेतली. त्यावेळी दोन जणांनी त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यानुसार गणेश निकम आणि एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक केली होती. संबंध मुलीची आणखी चौकशी केली असता आणखी दोघांनी त्यांच्यावर अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा सुमीरन गायकवाड आणि गणेश निकम या दोघांना अटक केली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.