हिंजवडीतील कमर्फट इन लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; तीन तरुणींची सुटका

0
2923

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – हिंजवडी ढवळे साखरे वस्ती येथील कमर्फट इन लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले असून पोलिसांनी तेथील तीन तरुणींची सुटका केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.३) रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली.

लालु अजब शेख (वय ३७, रा. रुम नंबर.०२०, सम्राटनगर, फेमस बेकरी, ओम शांती चाळ, मुंब्रा, मुंबई) आणि त्याचा साथीदार सागर भास्कर शेट्टी (वय ४७, रा. कमर्फट इन हॉटेल, लक्ष्मी चौक, हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अनवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, हिंजवडीतील ढवळे साखरे वस्ती येथील कमर्फट इन लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु आहे. यावर सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडी पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली असता तेथे तीन तरुणींकडून वेश्यागमन करुन घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने त्या तीनही तरुणींची सुटका करुन आरोपी लालु शेख आणि सागर शेट्टी या दोघांना अटक केली. सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी दोघी या उझबेकीस्तान देशातल्या आहेत. तर एक तरुणी ओडीसाची रहिवासी आहे. पोलिस उपनिरीक्षक कविता रुपनगर अधिक तपास करत आहेत.