हिंजवडीतील कन्स्ट्रक्शन साईटवरुन पावणेदहा लाखांचा ऐवज चोरीला

0
523

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – पॉली कॅब वायर, ग्रीनलँड कंपनीचे एमसीबी, आरसीसीबी असा एकूण ९ लाख ८८ हजार ७०२ रुपयांचे मटेरियल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १०) सकाळी नऊच्या सुमारास हिंजवडी येथील विलास जवडेकर इकोसेल्टर कन्स्ट्रक्शनच्या साईटवरुन उघडकीस आली.

याप्रकरणी नितीन भाऊराव तरंगे (वय ४०, रा. वारजे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेस २ येथे विलास जवडेकर इकोसेल्टर कन्स्ट्रक्शनची बांधकाम साईट सुरू आहे. साइटवर ठेवलेले पॉलीकॅब वायर, ग्रीनलँड कंपनीचे एमसीबी आणि आरसीसीबी असे तब्बल ९ लाख ८८ हजार ७०२ रुपयांचे मटेरियल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.