Chinchwad

हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीमधील चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न

By PCB Author

October 01, 2018

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीमध्ये असलेल्या चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न तिन ते चार चोरट्यांनी केला. ही घटना रविवारी (दि.३०) रात्री दहाच्या सुमारास इन्फोसिस कंपनीतील फेज-२ येथे घडली.

याप्रकरणी दिलीप गिताराम म्हस्के (वय ५०, रा. तनिष्क आयकन, डांगे चौक, काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात तीन ते चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीच्या फेज-२ येथे असलेले चंदनाचे झाड चोरण्यासाठी तिन ते चार चोरट्यांनी प्रवेश केला होता. ही बाब कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी चोरट्यांना हटकले असता चोरट्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी तीन ते चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.