Maharashtra

“हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा,” – शिवसैनिक

By PCB Author

January 10, 2020

सोलापूर, दि.१० (पीसीबी) – शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज आहेत . या नाराजीतून त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ दिली. त्यामुळे सोलापुरातील शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले असून याच पार्श्वभूमीवर “हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा,” अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी केली आहे.

“उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे. वेळीच नांग्या मोडा – निष्ठावंत शिवसैनिक,” असे बॅनर सोलापूरमध्ये लावण्यात आले आहेत. यात तानाजी सावंत यांचा उल्लेख खेकडा असा करण्यात आला आहे. सोलापुरातील मेकॅनिक चौकात हा बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर सोलापुरात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.