Banner News

हाथसरच्या पिडीत कुटुंबाचे आश्रुच खूप काही बोलके – प्रियांका गांधी

By PCB Author

October 03, 2020

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – हाथसर मधील त्या कुटुंबाला भेटले. त्यांचे आश्रुच त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची साक्ष देतात, ते खूप बोलके आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अडथळ्यांची शर्यत पार करून मोठ्या कष्टाने आम्ही या कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणात पिडीत मुलीवर आणि या तिच्या कुटुंबाला ज्या पध्दतीची वागणूक मिळाली ती कोणाही संवेदनशील व्यक्तीला घायाळ करेल, असेही प्रियांका यांनी ट्वीट केले आहे. पिडीत कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दिल्ली येथून हथसरला निघाले होते. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या पोसिलांनी गावात कोणालाही जाण्यास बंदी घातली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल व प्रियांका गांधी हे ३४ खासदारांसह हाथसरला निघाले होते. त्यांचा ताफा नोयडा रस्त्यावर पोलिसांनी अडविल्याने संघर्ष झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने तणाव होता. अखेर फक्त पाच जणांना पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास गांधी बहिण भाऊ हाथसरमध्ये पोहचले. या भेटीनंतर प्रियांका गांधी यांनी ट्वीट केले आहे. प्रियंका गांधी या सातत्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सीबीआय चौकशीची शिफारस – हाथरसमध्ये झालेल्या कथित गँगरेप प्रकरणावरुन वाद वाढल्यावर उत्तर प्रदेश सरकारने या घटनेच्या सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. काँग्रेसच्या प्रतिनिधींनी आज पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटून न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. आज उत्तर प्रदेशचे अतिरिक्त सचिव अवनीश अवस्थी आणि डीसीपी एच. सी. अवस्थी यांनी सरकार या घटनेचा निष्पक्ष तपास करेल असं स्पष्ट केलं. मायावती राजकारण करत आहेत- आठवले उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा नेत्या मायावती यांनी हाथरस घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर मायावती हाथरस प्रकरणी राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. स्रोत,GETTY IMAGES उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार त्यांना नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. हाथरस प्रकरण मानवतेवरील कलंक असल्याचं सांगत चारही आरोपींना मृत्युदंड व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली आहे.तत्पुर्वी मायावती यांनी हाथरस घटनेवर एक व्टीट केले होते. त्यात त्या म्हणतात, “हाथरसमधील घृणास्पद सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे देशभरात आक्रोश केला जात आहे. त्याच्या सुरुवातीच्या तपास अहवालावरून जनतेचं समाधान झालेलं दिसत नाही. या प्रकरणाची सीबीआय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली तपासणी व्हावी ही बसपाची मागणी आहे.” स्मृती इराणी यांचा ताफा अडविला – हाथसर प्रकरणातील संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुपारी वारणसी येथून जाणारा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या वाहनांचा ताफा अडविला. काळे झेंडे दाखवून त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. पावला पावलावर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या वाहनासमोर येत होते आणि पोलिस त्या कार्यकर्त्यांना ओढून बाजुला नेत होते. सुमारे २० मिनिटे हा गोंधळ सुरूच होता. अखेर महिला एसआरपी पथकाने इराणी यांच्या वाहनाभोवती कडे केले आणि त्यांनी सुरक्षितपणे रस्ता करून दिला. ‘काँग्रेसला न्याय नको, राजकारण हवंय’ – स्मृती इराणी हाथरस बलात्कार प्रकरणावर बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “जनतेला हे माहित आहे की, त्यांचं (राहुल गांधी आणि काँग्रेस) हाथरसकडे जाणं हे राजकारणासाठी आहे, पीडित कुटुंबासाठी न्याय मिळवून देण्यासाठी नव्हे,” असं स्मृती इराणी आज (3 ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. हाथरस बलात्कार प्रकरणावर स्मृती इराणी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन बोलल्या. स्मृती इराणी अद्याप का बोलत नाहीत, असे प्रश्न शुक्रवारी (2 ऑक्टोबर) सर्वत्र विचारले जात होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत म्हटलंय, “उत्तर प्रदेशात माता-भगिनींचा सन्मान-स्वाभिमान यांना धक्का लावण्याचा साधा विचारही करणाऱ्यांचा समूळ नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा करण्यात येईल जी भविष्यासाठी उदाहरण असेल. तुमचं उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता-भगिनींची सुरक्षा आणि विकास याप्रती संकल्पबद्ध आहे.”