हातगाडी, टपरी दंडाबाबत फेरविचार करू; आमदार महेश लांडगे, आझमभाई पानसरे  यांचे आश्वासन

0
567

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने हातगाडी , टपरी धारकाकडून सुमारे ६४००, १२८०० आणि ३८४०० रुपये अतिक्रमण आणि प्रशासकीय शुल्क आकारण्याचा ठराव केला आहे. हा ठराव अन्यायकरक असून तो रद्द करावा, अशी मागणी आज (सोमवारी) महाराष्ट्र फेरीवाला क्रान्ती महासंघाच्या वतीने आमदार महेशदादा लांडगे, आझमभाई पानसरे , पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे केली. यादंडावर फेरविचार करणार असल्याचे आमदार महेश लांडगे, आझमभाई पानसरे यांनी यावेळी बोलताना आश्वासन दिले.

यावेळी  महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ  नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, समंव्ययक इरफान चौधरी, कासीम तांबोळी, रामा बिरादार, संचित तिखे, अम्बालाल सुखवाल, हरी भोई, बाळासाहेब सोनवणे, पप्पू तेली, देवीलाला अहीर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून फेरीवल्यावर अन्यायकारक कारवाई सुरु आहे. यात परवाना धारक विक्रेत्यांवर हि कारवाई सुरु आहे ,यात त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे . हॉकर्स झोन न करता महापालिका प्रशासन दडपशाही करत आहे. ही दडपशाही बंद करावी, आदी मागण्यासाठी आज (सोमवारी) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटून चर्चा केली . यावेळी यावर फेरविचार करू, असे आश्वासन आमदार महेश लांगडे, आझमभाई पानसरे यांनी दिले.