हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करताय….. सावधान घडली आहे ‘अशी’ एक घटना

0
924

देहूरोड, दि. ९ (पीसीबी) – हळदीच्या कार्यक्रमाला गर्दी करून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 7) रात्री विकासनगर, किवळे देहूरोड येथे घडला.

रोहन राजेंद्र रिटे (वय 21), रोहित राजेंद्र रिटे (वय 23, दोघे रा. विकासनगर किवळे देहूरोड), स्पीकर चालक विवेक विकास कांबळे (वय 19, रा. खडकी वसाहत, खडकी), नितेश पवार (रा. खडकी बाजार, खडकी) आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल कैलास उल्लारे यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास बंदी केली आहे. तसेच विवाह आणि अंत्यविधी देखील अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास सांगितले आहे. असे असतानाही विकासनगर येथे रोहित रिटे याच्या हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शासनाने ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.