Maharashtra

हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांची बंद दाराआड चर्चा   

By PCB Author

September 04, 2019

सोलापूर, दि. ४ (पीसीबी) – गेली अनेक दिवसांपासून भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असलेले काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. या दोघांमध्ये अकलूज येथे बंद खोलीत तासभर चर्चा झाली. यावेळी पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते.

इंदापूर विधानसभेची जागा  काँग्रेसला सोडण्याची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. मात्र, विद्यमान आमदार दतात्रय भरणे यांना डावलण्यास राष्ट्रवादी तयार नाही.  त्यामुळे नाराज असलेले पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (बुधवार) कार्यकर्त्यांचा मेळावा  बोलविला आहे.

त्याआधी हर्षवर्धन पाटील यांनी मोहिते पाटलांची भेट घेतल्याने त्यांचा भाजप प्रवेश  निश्चित मानला जात आहे.  भेटीनंतर पाटील हे आजच निर्णय घेतो, असे सांगून बावड्याकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.  हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश  घडवून आणण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील  यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.