Pune Gramin

   हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन

By PCB Author

January 15, 2019

पुणे, दि. १५ (पीसीबी) – काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील (वय ७५) यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांना  फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील  एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.   

रत्नप्रभा पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य व दुध संघाचे संचालक म्हणून  काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात      मुलगा हर्षवर्धन, मुलगी चित्रा कोरटकर  व चेतना मोटे (श्रीगोंदा) असा परिवार आहे. बुधवारी (दि. १६)   सकाळी ७ ते १० या दरम्यान  बावडा (ता.इंदापूर) येथील रत्नाई निवासस्थानामध्ये  त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शहाजीबाग येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.