Maharashtra

हर्षवर्धन जाधवची उध्दव ठाकरेंवर टीका म्हणजे सुर्यावर थुंकणे

By PCB Author

October 16, 2019

औरंगाबाद, दि. १६ (पीसीबी) –  हर्षवर्धन जाधव यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. पराभव समोर दिसू लागला म्हणून ते असे बोलत आहेत. हर्षवर्धनचे उध्दव ठाकरे यांच्यावर बोलणे म्हणजे सुर्यावर थुंकणे आहे, अशा शब्दांत आमदार आंबादास दानवे यांनी त्यांचा निषेध केला आहे.

कन्नडच्या सभेत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना  पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून टीका केली होती. त्या टीकेला आमदार अंबादास दानवे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले आहे.  हर्षवर्धन जाधव याला पोलिसांनी तुडवले होते. तेव्हा उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली होती. शिवसेनेने तिकिट दिले होती. जाधव याला २४ ऑक्टोबरला कळले  कोण कोणाचा बाप आहे ,   असेही दानवे म्हणाले.

दरम्यान, कन्नड येथे हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका  करताना उद्धव ठाकरेंना मुस्लमान चालत नाही. हर्षवर्धनमूळे मुस्लिम उमेदवार निवडून आला. हिरवा उतरवून भगवा फडकविण्याचे बोलणाऱ्या उद्धव ठाकरे मला एक विचारायचे. शिवसैनिकांना एक विचारायचे हिरवा नको म्हणतात. मग सत्तार हा काय तुमच्या आईचा नवरा आहे  का ? अशा खालच्या पातळीवरील  टीका केली होती.