हरिश्चंद्रगडावर गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपचा यशस्वी ट्रेक

0
525

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – भंडारदरा अभयारण्य व त्याच्या आजूबाजूस असणाऱ्या सह्याद्रीच्या अतिउंच शिखरामधील निसर्गसौन्दर्याने नटलेल्या  ऐतिहासिक हरिश्चंद्रगडावर गरवारे निसर्गप्रेमीं ग्रुपच्या वतीने नुकताच यशस्वी ट्रेक पूर्ण केला. 

सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईण्टस आहेत. त्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा, दुर्गवेड्यांचा ‘विक पॉईण्ट’. ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या त्या गडाच्या परिसरातील  कातळ शिल्पे, खोल दऱ्या, उरात धडकी भरवणारे उभे कडे, समृद्ध वनसंपदा, प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडवणार देखण शिव मंदिर या ठिकाणी आहे

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय.  “कोकणकडा” म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पाहण्यात जो आनंद आहे. तो अवर्णनीयच आहे.

या ट्रेकचे नियोजन शाम कुंभार यांनी केले.यावेळी माधव ढमाले, काळूराम कुंभार, संजय खोत, सतीश तारू, विलास पाटील, प्रज्ञा कुंभार, पल्लवी तारू ,लहान ट्रेकर वैष्णवी तारू यांनी सहभाग घेतला.