हरियाणातील काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या

0
369

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) –  कारमधून प्रवास करत असताना हरियाणातील काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना फरिदाबाद येथे घडली आहे. काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी  असे त्यांचे नांव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विकास चौधरी जीममधून बाहेर आले असता काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. विकास चौधरी आपल्या गाडीत बसले होते. यावेळी त्यांच्यावर आठ ते दहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना जखमी अवस्थेत  रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

दरम्यान, सध्या राज्यात जंगलराज  सुरु आहे. कायद्याची कोणतीही भीती नाही. काही दिवसांपूर्वी छेडछाडीला विरोध केल्याबद्दल एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली  होती, असे हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी  सांगितले.