Desh

हरयाणात काँग्रेसला मतदान केल्याने भावाने केला भावावर गोळीबार

By PCB Author

May 15, 2019

झज्जर, दि. १५ (पीसीबी) – हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यात काँग्रेसला मतदान केल्याने भाजप समर्थक भावाने काँग्रेस समर्थक चुलत भावावरच गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

या गोळीबारात राजा नावाचा तरुण आणि त्याची आई जखमी झाले आहेत. तर धर्मेंद्र असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झज्जरमधील सिलाना गावात मतदानाच्या दिवशी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावरुन रस्सीखेच सुरु होती. राजाला आरोपी धर्मेंद्रने भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र राजाने असे करण्यास स्पष्ट नकार दिला. तोच राग मनात ठेऊन धर्मेंद्रने सोमवारी सकाळी राजाच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळाबार केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राजाच्या आईलाही किरकोळ दुखापत झाली. मात्र गोळाबारात राजा गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत राजाला रोहतकच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजाची आणि त्याच्या आईची प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गोळी झाडेलेली बंदूक अवैध असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांमार्फत समोर येत आहे. आरोपी धर्मेंद्र फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.