Desh

हरयाणातील जमीन खरेदी प्रकरणात रॉबर्ट वड्रा आणि माजी मुख्यमंत्री हुडा यांच्यावर गुन्हे

By PCB Author

September 02, 2018

दिल्ली, दि. २ (पीसीबी) – जमीन खरेदीतील अनियमततेविरोधात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरयाणातील गुरुग्राम येथे गृहसंकूल व व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या एफआयआरमध्ये दोन रियल इस्टेट कंपन्यांचीही नावे असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिन खरेदी प्रकरणात वड्रा यांनी ५० कोटींचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. स्वस्त दरात जमीन खरेदी करून सरकारच्या मदतीने जास्त दरात विकण्याचा आरोप वाड्रांच्या स्कायलाईट कंपनीवर होता. भूपेंद्र सिंह हुड्डा मुख्यमंत्री असताना हे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणामध्ये रॉबर्ड वड्रा यांच्या नावावरून विरोधी पक्ष काँग्रेसला निशाण्यावर घेत होते. हरयाणातील भाजप सरकारने यापूर्वीच या जमीनखरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना केली आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा केला होता. वड्रा, हुडा या दोघांसह स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ या कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.