Pune

हडपसरमध्ये मामाने केला भाच्याचा डोक्यात दगड घालून खून

By PCB Author

January 16, 2019

हडपसर, दि. १६ (पीसीबी) – दारुच्या नशेत किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून मामाने स्वत:च्या भाच्याचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना हडपसर येथे मंगळवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास घडली.

संपत माणिकराव उडदे (वय ३५,रा. हडपसर, मुळ रा. मध्यप्रदेश) असे खुन झालेल्या भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, आरोपी मामा मंगलसिंग मोया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत आणि त्याचा मामा मंगलसिंग दोघेही मध्यप्रदेशहून पुण्यात काम करण्यासाठी आले होते. ते पुण्यात मजुरीचे काम करायचे. मंगळवारी ते दोघेही दारु पिले होते. या दरम्यान त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. यामुळे रागाच्या भरात मामा मंगलसिंग याने संपत याच्या डोक्यात दगड मारुन त्याचा खून केला आणि पत्नीसह फरार झाला. हडपसर पोलीस तपास करत आहेत.