Pune

हडपसरमध्ये प्रेमभंग करणाऱ्या तरुणीला पोस्टरव्दारे धमकी

By PCB Author

December 05, 2018

पुणे, दि. ५ (पीसीबी) – प्रेमभंग झालेल्या एका तरुणाने प्रेयसीला धमकी देणारी पोस्टर हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजच्या परिसरात लावल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.४) दुपारच्या सुमारास समोर आली.

प्राप्त माहितीनुसार, हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजच्या समोर रस्त्यावरील खांबावर मंगळवारी दुपारच्या सुमारास प्रेमभंग झालेल्या तरुणाने प्रेयसीला धमकी देणारी पोस्टर चिटवलेली आढळून आली. कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या तरुणांना ते समजल्यावर ती वाचण्यासाठी तेथे एकच झुंबड उडाली. ही बातमी काही वेळात सर्वत्र पसरली. हडपसर पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी  दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी बरेचशा भिंतींवर आणि खांबांवर पोस्टर आढळून आले. त्यांनी ती पोस्टर ताब्यात घेतली. हडपसर पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान, आकाश नावाच्या तरुणाने ही पत्रे लिहिली असून त्यामध्ये तो एका तरुणीशी रिलेशनशीपमध्ये होता. गेल्या वर्षी त्यांनी घरच्यांना न सांगता गुपचूप लग्न केले होते. दोघेही एकत्र राहत होते. पण काही महिन्यांपूर्वी तरुणी त्याला सोडून गेली. कारण तिचे त्याच्या आईशी पटत नव्हते. तिला पैसा खूप महत्वाचा असून ती आता दुसऱ्याबरोबर लग्नाला तयार झाली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. एवढ्या वर्षाच्या रिलेशनशीप नवरा बायकोचे नात तोडून ती कोण कुठल्या तरुणाबरोबर लग्न करीत आहे. जी मला सोडून आली. ती काय कोणाची राहणार असे म्हणून मी तुला राहून देणार नाहीच अशी धमकी या आकाशने त्या तरुणीला दिली आहे.