हडपसरमध्ये धारदार शस्त्राने वार करुन अल्पवयीन सराईत गुन्हेगाराचा खून

0
3743

मांजरी, दि. २९ (पीसीबी) – धारदार शस्त्राने वार करुन अज्ञात हल्लेखोरांनी एका अल्पवयीन सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२८) रात्री नऊच्या सुमारास मांजरी गावातील मांजराई देवी मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेतून उघडकीस आली.

तुषार मोहन भापकर (वय १७, रा. वेताळनगर, मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या अल्पवयीन सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास मांजरी गावातील मांजराई देवी मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत आज्ञात आरोपींनी तुषार यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी  अज्ञात हल्लेखोरांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हडपसर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, तुषार हा सराईत गुन्हेगार होता त्याच्याविरोधात जबरी चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.