Pune

हडपसरमध्ये टोळक्यांकडून आठ चारचाकी आणि एका रिक्षाची तोडफोड

By PCB Author

November 04, 2018

पुणे, दि. ४ (पीसीबी) – दोन गटातील टोळक्यांमध्ये झालेल्या भांडणातून हडपसर मधील ससाणे नगर येथील अमित हाईट्स सोसाटीतील वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अज्ञात टोळक्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील ससाणे नगर भागात दोन गटातील टोळक्यांमध्ये शनिवारी रात्री भांडणे झाली. या भांडणांमध्ये टोळक्यांनी अमित हाईट्स सोसायटीच्या सभासदांच्या आठ चारचाकी आणि एका रिक्षाची तोडफोड केली. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  दरम्यान पोलिसांना या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.