हज यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी आले नवे अॅप; वाचा काय आहे विशेष सुविधा

0
468

लखनौ, दि. १२ (पीसीबी) – हज यात्रेकरूंची सुरक्षा आणि अडचणी सोडविण्यासाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. काउंसिल जनरल ऑफ इंडियाकडून इंडियन हाजी इन्फरेमेशन सिस्टम असे या अॅपचे नाव असून ते नुकतच लॉच करण्यात आले.

हे अॅप हज यात्रेकरू प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकतात. हज यात्रेला जाणाऱ्या फ्लाईट पासून ते मदिनामधील लोकेशनपर्यंत सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. सोबत या अॅपच्या मदतीने हज सेवकांशी संपर्क देखील करता येणार आहे.

या अॅपच्या माध्यमातून हज यात्रेकरू भारतीय हज कार्यालयाशी सरळ संपर्क साधू शकतात. तसेच अॅपमध्ये असलेल्या आपत्कालीन टोल फ्री क्रमांक ८००२४७७७८६ यावर फोन करून आपल्या अडचणी सांगू शकतील.  या  अॅपमध्ये हज यात्रेकरूंना आपला कव्हर क्रमांक, पासपोर्ट क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. ही माहिती अपडेट केल्यानंतर अॅप सक्रिय होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून हज सेवक कुठे तैनात आहेत. यात्रेकरूंसाठी कोणकोणत्या सुविधा आहेत. हॉस्पिटल, हॉटेल्स यासारख्या सुविधांबाबत देखील माहिती मिळणार आहे.  यामध्ये यात्रेकरूंच्या फीडबॅकची देखील सुविधा आहे. अॅपवर उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये एक फॉर्म भरून यात्रेकरू फीडबॅक देऊ शकतील.