हजारो रुपयांचा गुटखा ठेवला होता घरात साठवून; निगडी पोलिसांना माहिती मिळताच…

0
563

निगडी, दि. १८ (पीसीबी) – शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, तंबाखू, विमल, सागर पान मसाला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या एका घरामध्ये छापा मारून निगडी पोलिसांनी 43 हजार 638 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेपाच वाजता ओटास्कीम येथे करण्यात आली.

नईम अलीम खान (वय 28, रा. ओटास्कीम, निगडी), राजू आण्णा (रा. साने चौक, मोरेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार सतीश ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू आण्णा याने आरोपी नईम खान याला गुटखा विक्रीसाठी दिला. नईम खान याने सर्व गुटखा त्याच्या घरात साठवून ठेवला. याबाबत निगडी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी नईम खान याच्या घरावर छापा मारून 154 पुडे पान मसाला, 154 पुडे तंबाखू, 187 पुडे विमल, 128 पुडे सागर पान मसाला असा एकूण 43 हजार 638 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.