स्वाईन फ्लूमुळे गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू

654

सोलापूर, दि. १३ (पीसीबी) – स्वाईन फ्लूने ग्रासलेल्या एका गर्भवती महिलेच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला त्यानंतर त्या महिलेचा देखील मृत्यू झाला. ही दुखद घटना सोलापूरातील मार्कंडेय रुग्णालयातून समोर आली आहे.  

जयश्री सदानंद हाके (वय ३०, रा. भवानी पेठ, सोलापूर) असे मयत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भवानी पेठ येथे राहणार्‍या जयश्री हाके यांना मार्कंडेय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जयश्री या गरोदर होत्या. त्यांना स्वाईन फ्लू हा आजार झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी जयश्री यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आणि सोमवारी जयश्री यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन ते तीन महिन्यांत सोलापूर शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूसारख्या आजाराने थैमान घातले होते. गेल्या काही दिवसांत या आजाराचे रुग्ण कमी होत असल्याचे दिसत असतानाच अचानक सोमवारी महिला आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याने खळबळ उडाली आहे.