‘स्वत:वर ‘द गे’ (The Gay)  नावाचा चित्रपट बनव’ , म्हणणाऱ्याला करणचे सडेतोड उत्तर

0
858

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर अनेकदा त्याच्या लैंगिकतेमुळे चर्चेत राहिला आहे. याच विषयावरून ट्विट करणं एका युझरला महागात पडलं आहे. कारण लैंगिकतेवरून ट्रोल करणाऱ्याला करण जोहरने सडेतोड उत्तर दिले आहे.

करणला स्वत:च्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा सल्ला देत त्या चित्रपटाचे नाव ‘द गे’ (The Gay) असे ठेवावे असे त्या ट्विटर युझरने ट्विट केले होते. ट्रोलरचे ट्विट रिट्विट करत करणने लिहिले की, ‘तू खरंच खूप अभ्यासू आहेस. इतके दिवस कुठे लपून बसला होतास? आज ट्विटरवर सर्वांत योग्य मुद्दा उचलल्यामुळे मी तुझे आभार मानतो.’ करणच्या या उत्तरानंतर नेटकऱ्यांनीही त्या युझरवर टीकांचा भडीमार केला. यानंतर संबंधित युझरने त्याचे ट्विट डिलीट केले.

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला मजेशीररित्या कसे घ्यावे हे शिकल्याचे करणने अरबाज खानच्या शोमध्ये म्हटले होते. ”सुरुवातीला ट्रोल करणाऱ्यांचा मला फार राग यायचा. पण आता त्या गोष्टी मी मजेशीररित्या घेऊ लागलो आहे,” असे तो म्हणाला होता.