स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी नथुराम गोडसे – कमल हासन

0
530

चेन्नई, दि. १३ (पीसीबी) – ‘महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता,’ असे विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख  कमल हसन यांनी केले. चेन्नईतील अरिवाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत कमल हासन बोलत होते. नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी होता आणि तो हिंदू होता. इथे मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे, असे हासन म्हणाले.

गांधीजींची हत्या झाली. त्याचा न्याय मागण्यासाठी मी इथे आलो आहे. मी सच्चा भारतीय आहे आणि देशात शांतता आणि समानता प्रस्थापित व्हावी हे कोणत्याही भारतीयाला वाटते. माझाही तोच प्रयत्न आहे, असे सांगतानाच तिरंगा ध्वजच भारताचा राष्ट्रीय ध्वज राहिला पाहिजे, असेही ते म्हणाले.