Pimpri

स्वच्छ भारत अभियान निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

By PCB Author

November 01, 2018

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छ भारत अभियान कक्ष आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनतर्फे (इसीए) आंतरशालेय निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत महापालिका शाळांतील साडेतीन हजार, तर खासगी शाळांतील ३ हजार ९०० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक सारंग गवळी, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शिक्षणाधिकारी पराग मुंडे, पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील, इसीए विश्वस्त विश्वास जपे, पुरषोत्तम पिंपळे, आदी उपस्थित होते.

इसीएच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहुल जाधव यांना पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांना पर्यावरण जागृत अधिकारी म्हणून गौरवण्यात आले. यावेळी आमदार महेश दादा लांडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर मेरूकर यांनी केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.