स्मृती मानधनाचे पहिले कसोटी शतक दिवस-रात्र सामन्यात

0
377

देश, दि. १ (पीसीबी) : भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी बाद झाली. मात्र, बाद होण्यापूर्वी तिने दिवस-रात्र कसोटी सामन्यातील पहिली भारतीय शतकवीरांगना होण्याचा मान मिळविला.

फॉर्ममध्ये असणाऱ्या मानधनाने कसोटी कारकिर्दीमधील पहिले शतक दिवस-रात्र कसोटी सामन्यात झळकावले. तिची ही शतकी खेळी ऐतिहासिक ठरली. तिच्या या शतकी खेळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करणारी देखिल ती पहिली भारतीय ठरली आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ इंग्लंडच्या महिलां खेळाडूंनीच शथकी खेळी केली आहे.

स्मृतीने आपल्या पहिल्या दिवसाच्या ८४ धावांच्या नाबाद खेळीवरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर आज एलिसे पेरी हिला चौकार लगावत तिने शतक पूर्ण केले. तिने १७० चेंडूंत आपली शतकी खेळी केली. तिच्या शतकी खेळीने दुसऱ्या दिवशीही भारताने आपले वर्चस्व राखले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोच्च खेळी करण्याचा मानही तिने या खेळीने मिळविला. तिने कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२७, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०२ आणि टी २० मध्ये ६६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने मॉली हाईड हिला मागे टाकले.