स्मृती इराणींच्या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

0
677

पुणे, दि. २४ (पीसीबी) – शबरीमला मंदीर प्रवेशावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महिलाविषयी बेताल विधान केले होते. या विधानाच्या निषेधार्थ आज (बुधवार) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तांबडी जोगेशवरी मंदिराबाहेर आंदोलन करण्यात आले.  

यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्थित होते. तर महिला कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी स्मृती इराणी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी वंदना चव्हाण म्हणाल्या की, भाजपच्या अनेक मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी महिलांविषयी बेताल विधाने केली आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळले आहे. ही निषेधार्थ बाब आहे. स्मृती इराणी यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा  त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का? असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. देवाच्या मंदिरात जाणे आणि तिथे जाऊन प्रार्थना करणे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल, असा सवाल स्मृती इराणींनी केला आहे.