स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; एकास अटक, दोन महिलांची सुटका

0
465

पिंपळे गुरव, दि.२८ (पीसीबी) – येथे एका स्पा सेंटर मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी जावळकर कॉलनी, पिंपळे गुरव येथील स्पेशल इफेक्ट स्पा सेंटर येथे करण्यात आली.

गोपाल रमेश मिश्रा (वय 33, रा. रामनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या  त्याच्याशी एक महिला (वय 29, रा. हडपसर, पुणे) आणि जुबेर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळकर कॉलनी येथे स्पेशल इफेक्ट स्पा सेंटर आहे. यामध्ये आरोपींनी दोन महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी आणले होते. त्या महिलांकडून आरोपी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिलेल्या पैशांवर आरोपी त्यांची गुजराण करत होते.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजता स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. एकाला अटक करून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत आठ हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.