Banner News

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या संतोष लोंढे यांचा अर्ज दाखल

By PCB Author

March 02, 2020

पिंपरी, दि.२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे यांचा अर्ज आज दि.२(सोमवार) रोजी दाखल करण्यात आला आहे. दि.६ (शुक्रवार) रोजी शिक्कामोर्तब होईल.

लोंढे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुवर्णा बुडे आणि अनुमोदक म्हणून राजेंद्र लांडगे यांनी स्वाक्षरी केली आहे.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली आहेत. ६ मार्ज रोजी दुपारी बारा वाजता निवडणूक होणार आहे.

यावेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, मा.स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, भीमाबाई फुगे, नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते.