स्कूल व्हॅनच्या धडकेत ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी अंत

0
436

लातूर, दि. १२ (पीसीबी) – स्कूल व्हॅनने दिलेल्या धडकेत एका ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.११) संध्याकाळच्या सुमारास लातूरच्या किणगावमध्ये घडली.

गायत्री हंगे (वय ६) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, लातूरच्या किणगावमध्ये राहणारी गायत्री शाळा सुटल्यानंतर गुरुवारी (दि.११) संध्याकाळी आपल्या घरासमोर व्हॅनमधून उतरली. गायत्री कोणत्या बाजूने घराकडे जात आहे, हे वाहनचालकाच्या लक्षात आले नाही. त्यावेळी गाडी पुढे घेताना गायत्रीला स्कूल व्हॅनची जोरदार धडक बसली. गंभीर जखमी अवस्थेत गायत्रीला लातूरच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा गायत्रीचा मृत्यू झाला. सकाळी पोस्टमार्टम करण्यात आले असून दुपारनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अतिशय हसमुख आणि सुंदर असलेल्या गायत्रीच्या अचानक जाण्याने गायत्रीच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.