सोहराबुद्दिन एनकाउंटर प्रकरण: माजी पोलिस महासंचालक डी.जी. वंजारा दोषमुक्त

0
422

मुंबई, दि. १० (पीसीबी) – सोहराबुद्दिन शेख एनकाउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुजरातचे माजी पोलिस महासंचालक डी.जी. वंजारा आणि अन्य पाच पोलिसांना दोषमुक्त केले आहे.

२००५-०६ मध्ये सोहराबुद्दिन, त्याची पत्नी कौसरबी व त्यांचा सहाय्यक तुलसीराम प्रजापती यांचे एनकाउंटर करण्यात आले होते.  याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुजरातचे माजी पोलिस महासंचालक डी.जी.  वंजारा आणि अन्य पाच पोलिस अधिकाऱ्यांना मुक्त केले होते. त्यांच्या मुक्ततेवर आज (सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

वंजारा यांना मुक्त करण्याविरोधात सोहराबुद्दिन याचा भाऊ रूबाबुद्दिन याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.  वंजारा आणि पाच पोलिस यांच्या मुक्ततेविरोधात सहा अर्ज दाखल करण्यात आले होते. जुलै चार पासून या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश ए.एम. बदर यांच्यापुढे सुरू होती. ऑगस्टमध्ये न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने वंजारा आणि अन्य पाच पोलिस अधिकाऱ्यांना मुक्त केले आहे.