सोसायटीत आलेल्या भटक्या कुत्र्यास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

0
179

सांगवी, दि. १४ (पीसीबी) – सोसायटीत आलेल्या एका भटक्या कुत्र्याला काठीने मारहाण केली. हा प्रकार 21 फेब्रुवारी 2021 रोजी कवडेनगर गल्ली, नवी सांगवी येथे घडला. याबाबत पाच महिन्यांनंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंगी जयंत येलुलकर (वय 46, रा. कवडेनगर गल्ली, नवी सांगवी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 13) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप चौगुले पाटील (वय 50), निरंजन दिलीप चौगुले (दोघे रा. कवडेनगर गल्ली, नवी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीमध्ये राहतात. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांच्या सोसायटी मध्ये आलेल्या भटक्या कुत्र्याला आरोपींनी काठीने मारून जखमी केले. याबाबत फिर्यादी यांनी सुमारे पाच महिन्यानंतर फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.