सोसायटीच्या स्टोअर रूममधून तब्बल ‘एवढ्या’ लाखांची वायर चोरीला

0
379

तळेगाव दाभाडे , दि. 7 (पीसीबी) : सोसायटीच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेली दोन लाख 28 हजारांची पॉली केप वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमाटणे फाटा येथील टाटा ऑटोकम हाऊसिंग सोसायटी येथे रविवारी (दि. 3) सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आली.

सदाशिव नथू साबळे (वय 60, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा येथील परंदवडी रोडवर टाटा ऑटोकम हाऊसिंग सोसायटी आहे. सोसायटीच्या स्टोअर रूममध्ये इलेक्ट्रिक वायरिंगच्या कामासाठी पॉलिकेप वायर ठेवली होती. शनिवारी (दि. 2) दुपारी पाच ते सोमवारी सकाळी साडेअकरा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी स्टोअर रूमचे लॉक तोडून दोन लाख 28 हजार 297 रुपये किमतीचे 59 बंडल वायर चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.