Pune

सोशल मीडियावर अश्लील फोटो पाठवत महिलेचा विनयभंग

By PCB Author

May 18, 2022

हिंजवडी, दि. १८ (पीसीबी) – अनोळखी व्यक्तींनी महिलेला तिच्या सोशल मीडियावर अश्लील फोटो पाठवून तिचा विनयभंग केला. ही घटना 25 एप्रिल ते 16 मे 2022 या कालावधीत हिंजवडी परिसरात घडली.

याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी आरोपीने तीन वेगवेगळ्या नंबरवरून फिर्यादीच्या व्हाट्सअपवर अश्लील फोटो पाठवले. महिलेशी अश्लील संभाषण करून तिचा ऑनलाईन पाठलाग करत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.