Maharashtra

सोलापूर भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामींनी आयुष्यात पहिल्यांदाच केले मतदान  

By PCB Author

April 18, 2019

सोलापूर, दि. १८ (पीसीबी) – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील  भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. या आधी कोणत्या  पक्षाला मतदान करावे, असा प्रश्न स्वामींना पडत होता. मात्र,  (गुरूवार)  स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने  त्यांनी मतदान केले.

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी अक्कलकोट तालुक्यातील आपल्या गौडगाव येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.  महास्वामीजींचे आज मौनव्रत असल्याने त्यांनी मीडियासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांच्यावतीने मुखेडचे बिरीप्रकाश महास्वामीजींनी भाजपच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, सोलापुरात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब रांगेत उभे राहून मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. सुशीलकुमार शिंदें यांच्यासमोर  जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचे आव्हान आहे.