Maharashtra

सोलापूर जि.प. अध्यक्षपद निवडणूक; ‘या’ तीन नेत्यांच्या रणनितीवर लक्ष

By PCB Author

December 29, 2019

सोलापूर, दि.२९ (पीसीबी) – जि.प. अध्यक्षपद निवडीला वेग आला असून भाजपसह महाविकास आघाडीकडून यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र आ. संजयमामा शिंदे, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे आणि समाधान आवताडे या तीन नेत्यांच्या रणनितीवर अध्यक्षपद कोणाकडे जाणार हे ठरणार आहे. त्यामुळे तिघांच्या रविवारी होणार्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जि.प. अध्यक्षपदाची निवडणूक ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. पहिली अडीच वर्षे भाजपाने समविचारी आघाडी करत सत्ता मिळवली होती. मात्र राज्यात झालेल्या महाविकास आघाडीने आता सत्तेची गणिते बदलण्याची शक्यता आहे. जि.प.मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी- सेना- शेकापने ही आघाडी स्थापन केली आहे. तर दुसरीकडे भाजपानेही पुन्हा सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राजा राऊत यांनी पुढाकार घेतला आहे.