सोलापूरात प्रथम नागरिक कुटुंबासह कोरोनाची बाधा

0
414

सोलापूर, दि. ३ (पीसीबी) – सोलापूर आता पूरते कोरोनाच्या कचाट्यात अडकले आहे. शहराच्या प्रथम नागरिकाचे आख्खे कुटुंबच बाधित झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तत्पुर्वी एक नगरसेवक, एक नगरसेविका आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अन्य शहरांच्या लोकसंख्येच्या तुलनेत ९०० वर कोरोना बाधितांची संख्या झाल्याने चिंतेचा विषय झाला आहे.


सोलापूर – महापालिकेतील प्रथम नागरिक कुटूंबासह कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन हैराण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात प्रथम नागरिक आल्या होत्या. त्यातूनच त्यांना आणि नंतर त्यांच्या कुटुंबाला संसर्ग झाल्याची चर्चा आहे.


गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तत्पुर्वी एक नगरसेवक, एक नगरसेविका आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली आहे. एका नगरसेविकेच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली होती, उपचारानंतर तो घरी परतला आहे.
सोलापुरात तब्बल 212 कंटेनमेंट झोन कोरोनाची बाधा झालेल्या आजच्या पदाधिकाऱ्याचा संपर्क कोणाकोणाशी झाला आहे याची माहिती घेतली जात आहे. अनेक शासकीय आणि महापालिकेतील बैठकीला हे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्यांचीही माहिती घेतली जात आहे.