Maharashtra

सोलापूरातून विजयकुमार देशमुख तर अहमदनगरमधून राम शिंदेंना पक्षातील कार्यकर्त्यांता विरोध

By PCB Author

September 10, 2019

सोलापूर/नगर, दि. १० (पीसीबी) – सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख तर अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या चिंतेत वाढली झाली आहे. कारण त्यांना आता पक्षातूनच शह मिळण्याची शक्यता आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी देशमुख यांच्याविरोधात बंडाची तयारी सुरु केली आहे. बनशेट्टी यांनी सोलापूर उत्तर शहर विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण ही निवडणूक त्यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवू असा इशारा बनशेट्टी यांनी दिला आहे.

तसेच भाजपने मिलिंद थोबडे यांना उमेदवारी दिली तर आपण पक्षाचे काम करणार असल्याचे शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. बनशेट्टी यांच्या या इशाऱ्यामुळे सोलापूर मधील भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता समोर आली आहे. या गटबाजीमुळे भाजपला येत्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षातील जेष्ठ नेते यावर कसा तोडगा काढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तसेच कर्जत-जामखेड मतदार संघात आता राम शिंदे यांचीही चिंता वाढली आहे. कारण कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनीच पालकमंत्र्यांविरोधात बंडाच निशाण फडकावले आहे. त्यामुळे राम शिंदे यांना आता ही निवडणूक कठीण जाणार असल्याच चित्र आहे.