Chinchwad

सोलापूरच्या उपमहापौरला मदत करणे सांगवी पोलिसांला पडले महागात…

By PCB Author

June 04, 2020

सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कंट्रोलला सलग्न तर उपनिरीक्षक निलंबीत

चिंचवड, दि. ०४ (पीसीबी) – सोलापुरचे उपमहापौर राजेश काळे यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना सोडूनही दिले. याप्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी करण्यात आली व पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांनी सांगवीच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांवर मंगळवारी (दि.०२) रात्री कारवाई केली आहे. वरिष्ठ निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना कंट्रोलच्या सलग्न करण्यात आले व उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबीत करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सांगवी परिसरात एकच जमीन अनेकांना विकुन फसवणूक केल्याचा गुन्हा सांगवी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. यामध्ये सोलापुर महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे आणि त्यांच्या साथिदारांचे नावे आहेत. याप्रकरणाचा तपास करताना सांगवी पोलिसांनी उपमहापौर यांना सोलापूर मधून ताब्यात घेऊन शुक्रवारी रात्री सांगवी येथे घेऊन आले.

तर लगेचच दुसऱ्या दिवशी शनिवारी उपमहापौर काळे यांना सोडण्यात आले, याप्रकरणाची विचारपुस केली असता सध्या कोरोनाची साथ चालू आहे, त्यात उपमहापौर काळे हे खोकत होते, त्यांना थंडी, ताप, शिंका व खोकला असल्याचे काळे सांगत होते त्यांची वैद्यकीय तपासणी करुन नोटीस बजावत काळेंना पोलिसांनी सोडण्यात आले. याबाबत पत्रकारांपर्यंत बातम्या आल्या त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन खातेअंतर्गत चौकशी करण्यात आली.

स्वतःच्या कामात कसुर केल्याचा ठपका लावत पोलिस आयुक्त बिष्णोई यांनी निरीक्षक साबळे यांना कंट्रोल ला सलग्न तर उपनिरीक्षक पन्हाळे यांना सेवेतुन निलंबीत करण्यात आले आहे.