सोलापूर, दि. १७ (पीसीबी) – सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. येत्या २० ऑगस्टला रश्मी बागल यांचा शिवसेना प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
याबाबत रश्मी बागल यांचे धाकटे बंधू दिग्विजय बागल यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. यात म्हटले आहे की, शिवबंधन हाती बांधण्याची वेळ आली आहे. याविषयीची सविस्तर चर्चा झाली असून शिवसेना आपल्याला तिकीट द्यायला तयार आहे. यावर रश्मी दिदींना अनुमती देण्यासाठी बागल गटावर प्रेम करणाऱ्या, खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या, निष्ठावान आणि प्रामाणिक पणे कोणत्याही परिस्थितीत बागल गटाला साथ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी दिनांक १९/८/२०१९ रोजी सकाळी १० वाजता बागल संपर्क कार्यालयात यावे. सर्वांना ही नम्र विनंती आहे.’, अशी पोस्ट
दरम्यान, माजी मंत्री दिवंगत दिगंबर बागल आणि माजी आमदार शामलताई बागल यांच्या रश्मी बागल कन्या आहेत. त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. बागल यांचा मकाई सहकारी साखर कारखाना मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे च त्या सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाला आहे.