सोलापुरात काही अतिउत्साही तरुणांनी फटाके फोडल्याने विमानतळ परिसरात लागली आग!

0
359

सोलापूर,दि.६(पीसीबी) – देशातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा देत रात्री ९ वाजता घरातील लाईट बंद करुन दिवे लावले आणि कोरोना विरोधातील आपली एकी दाखवून दिली. मात्र सोलापुरात काही अतिउत्साही तरुणांनी फटाके फोडल्याने विमानतळ परिसरात आग लागली.

या फटाक्यांच्या ठिणग्या विमानतळ परिसरात पडल्याने रविवारी (५ एप्रिल) रात्री मोठी आग लागली. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु दिवा लावण्याऐवजी फटाके फोडण्याचा अतिउत्साह मात्र इथे पाहायला मिळाला.

कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना घरातील लाईट बंद करुन घरात, अंगणात, गॅलरीमध्ये किंवा रस्त्यावर दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरम्यान, याचवेळी काही जणांनी अतिउत्साह दाखवत, मशाली पेटवल्या रस्त्यावर रॅली काढले, फटाके फोडले. वो