Pimpri

सोयीस्कर ठिकाणी लसीकरण व्हावे; एकता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका पवार यांची मागणी

By PCB Author

April 27, 2021

पिंपरी,दि.२७(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड मधील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांना जवळील आणि सोयीस्कर ठिकाणी लसीकरणाची सोय व्हावी अशी मागणी एकता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ सारिका महेंद्र पवार यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

प्रभाग क्रमांक ११ मधील पूर्णानगर, शरदनगर, फुलेनगर मधील सर्व अठरा वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जवळील ठिकाणी सोय उपलब्ध करून मिळावी त्यामुळे नागरिकांना लस घेणे सोयीचे होईल व लसीकरण होण्यास मदत होईल तरी जवळील ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात यावी अशी मागणी सौ. सारिका महेंद्र पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.