Others

सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By PCB Author

August 18, 2021

वाकड, दि. १८ (पीसीबी) – सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी महिलेची 61 हजारांचे दागिने नेले. ही घटना मंगळवारी (दि. 17) सकाळी साडेअकरा वाजता घडली.

याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता फिर्यादी त्यांच्या घरी असताना दोन अनोळखी इसम आले. सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचा बनाव करून दोघांनी फिर्यादी महिलेकडून 61 हजारांचे 20 ग्रॅम वजनाचे दागिने घेतले. विश्वासघात करून दोघेजण निघून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.