“सॉरी मी चुकलो,” काय म्हणाले उदयनराजे शशिकांत शिंदेंना?

0
614

सातारा, दि.५ (पीसीबी) – बुधवारी साताऱ्यातील एका गावात कार्यकर्त्याच्या लग्नात माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले अशा बातम्या आल्या होत्या. यावर आता शशिकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही भेट म्हणजे चुकून झालेली भेट होती. अश्रू अनावर झाल्याच्या बातम्या निराधार आहेत. उदयनराजे भोसले आणि माझा मार्ग वेगळा आहे. कार्यकर्ते आणि लोकांनी गैरसमज करून घेऊ नये, असे शिदें यांनी सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.