Pune Gramin

सैराटची पुनरावृत्ती: प्रेम प्रकरण मान्य नसल्याने आईने मुलीच्या डोक्यात दगड घालून केला खून

By PCB Author

May 14, 2019

बारामती, दि. १४ (पीसीबी) – मुलीचे प्रेम प्रकरण अमान्य असल्याने जन्मदात्या आईनेच मुलीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बारामती शहरातील प्रगतीनगर भागात घडली. खून करुन आई स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली.

ऋतूजा हरीदास बोभाटे (वय १९) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात आई संजीवनी हरीदास बोभाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतूजा ही बारामती शहरातील प्रगतीनगर भागात राहत होती. काही दिवसांपासून तिचे प्रेम प्रकरण सुरु होते. हे प्रेम प्रकरण तिची आई संजीवनी यांना अमान्य होते. यामुळे त्यांच्या वाद झाला. आणि संजीवनी यांनी ऋतूजाच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. खून केल्यानंतर आई संजीवनी या स्वत: बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्या. तसेच गुन्ह्याची कबुली दिली आहे. बारामती शहर पोलीस तपास करत आहेत.