सैन्याच्या कामगिरीचा राजकीय वापर नको; माजी लष्करी अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

0
369

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भारतीय सैन्याने केलेल्या लष्करी कारवायांचा राजकीय वापर होत असल्याने काही माजी सैनिक भडकले आहेत. यासंदर्भात त्यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे धाव घेतली असून त्यांना एक पत्रही लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये, असे आदेश त्यांना देण्यात यावेत, अशी विनंती केली आहे. हे पत्र लिहिणाऱ्या १५६ माजी सैनिकांमध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांच्यासह देशाच्या तिन्ही दलांच्या ८ माजी प्रमुखांच्या सह्या आहे. सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान सत्ताधारी भाजपाने सैन्याच्या कामगिरीवरुन मत मागण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. हेच या अधिकाऱ्यांना खटकले आहे, त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे.