Bhosari

सेक्टर क्रमांक ९ मधील रस्त्यांचे डांबरीकरण; सीमा सावळे, सारंग कामतेकर, समर कामतेकर यांचा पाठपुरावा

By PCB Author

February 13, 2019

भोसरी, दि. १३ (पीसीबी) –  सेक्टर क्रमांक ९ मधील स्पाईन मॉलशेजारील मुख्य रस्ता आणि समर्पण सोसायटी, साहील रेसिडेन्सी जवळील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांना सुरूवात झाली आहे. या कामांबाबत  स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनी  पाठपुरावा केला होता.

सेक्टर क्रमांक ९ मधील स्पाईन मॉलशेजारील मुख्य रस्ता आणि समर्पन सोसायटी, साहील रेसिडेन्सी जवळील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या रस्त्यांची दुरूस्ती करण्याच्या सुचना    स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या.  तसेच रस्त्यांच्या डांबरीकरण कामासाठी  लागणाऱ्या  आवश्यक निधीची तरतूद करून घेतली होती. हा निधी मंजूर झाल्यानंतर   डांबरीकरणास  सुरूवात करण्यात आली आहे.

या कामांसाठी भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनीही   महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू  केला होता.  आता या कामांना सुरूवात झाल्याने  नागरिकांनी समाधान व्यक्त  केले आहे.