सेक्टर क्रमांक १ मध्ये शौचालयाच्या कामाला सुरूवात ; सीमा सावळे, सारंग कामतेकर, समर कामतेकर यांचा पाठपुरावा

424

भोसरी, दि. १५ (पीसीबी) –  सेक्टर क्रमांक १ मधील वैष्णवी माता प्राथमिक विद्या मंदिराजवळ सार्वजनिक शौचालयाच्या  कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या कामांबाबत  स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनी  पाठपुरावा केला होता.

सेक्टर क्रमांक १ मधील वैष्णवी माता प्राथमिक विद्या मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला या कामांबाबत सुचना दिल्या होत्या.  तसेच  या  कामासाठी  लागणाऱ्या  आवश्यक निधीची तरतूद करून घेतली होती. हा निधी मंजूर झाल्यानंतर  शौचालयाच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे.

या कामांसाठी भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनीही   महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू  केला होता.  आता या कामांना सुरूवात झाल्याने  नागरिकांमधून समाधान  व्यक्त  केले जात आहे