Desh

सॅरिडॉन, फेंन्सेडिल आदीसह ३४३ औषधांवर बंदी ?

By PCB Author

August 04, 2018

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – केंद्रीय आरोग्य मंत्रालय डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल आदीसह  ३४३ औषधांवर बंदी घालणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेदनाशामक आणि फ्लू शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन ( एफडीसी) औषधे आहेत. या औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उप समितीने केली होती. त्यामुळे या औषधांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

या बंदीचा पिरामल, मॅक्लिऑड्स, सिपला, ल्युपिन यांसारख्या औषध बनवणाऱ्या कंपन्यांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे  या कंपन्या सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायायलयाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे.  ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार कोण कोणत्या औषधांवर बंदी घालायची त्याची यादी तयार करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने  डीटीएबीला सांगितले होते की आरोग्य मंत्रालयाला ही यादी सोपवा की कोणती औषधे रेग्युलेट, रेस्ट्रिक्ट किंवा पूर्ण बंद करायची आहेत. त्यानुसार ३४३ औषधांची नावे डीटीएबीने दिल्याचे समजते आहे. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन अर्थात एफडीसी औषधांवर बंदी घालण्यात यावी, असा मुद्दा केंद्राने उपस्थित केला. कंपन्या आणि सरकार यांच्या वादात न्यायालयाने  डीटीएबीला औषधांची यादी तयार करण्याची सूचना दिली आहे.