सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकरांची सोलापुरातील हॉटेलमध्ये भेट; चर्चांना उधाण

0
427

सोलापूर, दि. १३ (पीसीबी) –  सोलापूर लोकसभेचे  उमेदवार  सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज ( शनिवारी)  सकाळी सोलापुरात बालाजी सरोवर हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  

बालाजी सरोवर हॉटेल येथे प्रकाश आंबेडक थांबले होते.  तसेच येथे काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर ही थांबले होते. त्यांना भेटण्यासाठी शिंदे हॉटेल बालाजी सरोवरामध्ये आले. याठिकाणी प्रकाश आंबेडकर असल्याचे कळल्यानंतर शिंदेंनी त्यांची  भेट घेतली.

सोलापूर लोकसभा  मतदार संघात सुशील कुमार शिंदे यांच्यासमोर  प्रकाश आंबेडकरांनी रिंगणात उतरून  मोठे आव्हान उभे केले आहे. तर दुसरीकडे, आंबेडकर अकोला मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कोणती चर्चा झाली, याची चर्चा सुरू झाली आहे. तर या भेटीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.